शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठविले रक्ताने लिहिलेलं पत्र…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील चार महसूल मंडळांना अतिवृष्टीच्या मदतीच्या यादीतून वगळण्यात आल्याने रोष व्यक्त करत मदतीसाठी नाकतोडा येथील एका शेतकर्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठविले आहे.
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नामदेव पतंगे यांनी म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री साहेब, आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा सवाल आम्हाला पडला आहे. सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे झाले. तालुका प्रशासनाने 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना वितरीत करणार असल्याचे सांगितले. परंतु, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, बाभुळगाव व पुसेगाव या चार मंडळांना मदतीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे येथील शेतकरी निराश झाले. मदतीच्या यादीत चार मंडळांचा समावेश करून अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी.’

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…