संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी ; ईडी सादर करणार उत्तर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश विशेष न्यायालयाने दिले होते.
मागील एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत असून, ते आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या याचिकेवर ईडी आपलं उत्तर सादर करणार आहे.
संजय राऊतांच्या याचिकेवर ईडी आपलं उत्तर सादर करणार
ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला. आता राऊतांच्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसून मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ईडी आपलं उत्तर सादर करणार आहे.
राऊत सध्या 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत
राऊत यांच्या वतीने ॲड. विक्रांत साबणे यांनी पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर ईडीच्या वतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी आज निश्चित केली आहे. राऊत सध्या 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…