स्वतःच्या मोबाईल मधून फोटो काढला तर आता पोलिसांवरच कारवाई होणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वर्धा :- वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. ई- चलान दिली जाते. मात्र, अनेकदा ई- चलान देताना पोलीस कर्मचारी वैयक्तिक मोबाईलमध्ये वाहनांचे फोटो घेतात.
हे उल्लंघन यापुढे खपवून घेतल्या जाणार नाही. वैयक्तिक मोबाईलमध्ये फोटो काढल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे फोटो वैयक्तिक मोबाईलमध्ये काढल्यास आता थेट संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिला आहे. यामुळे आता वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढणार असून अवैध वसुली करणाऱ्यांवरही चाप बसणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जाते. कारवाई करताना ई-चलान मशीनच्या सहाय्यानेच कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्या मोबाइलमध्ये फोटो काढले जात होते. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या याची दखल घेत पोलीस महासंचालकांनी पत्र काढत अश्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहे.
वाहतुक पोलिसांपुढे प्रश्न..?
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे मशीनमध्ये फोटो काढून ई-चलान दिली जाते. मात्र, अनेकदा मशीनमध्ये तांत्रिक बिघाड येतो. तसेच संबंधित वाहनाचे लोकेशन दुसरे दाखवित असल्याने अनेकदा वैयक्तिक मोबाईलमध्ये फोटो काढावे लागतात. त्यामुळे मोठ्या अडचणी येतात. यामुळे अशी अडचण आल्यास वाहन चालकाला सोडून द्यावे का? असा प्रश्न आता वाहतूक पोलिसांना पडला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…