एक अनोखा “सत्कार” ; अन्न औषध उपायुक्तांचा गुटखा भेट देऊन केला एक अनोखा “सत्कार” ; सर्रास विक्रीवरून करण्यात आला निषेध….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- आतापर्यंत आपण चांगले काम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा, अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करून सत्कार केलेला पाहिला असेल. मात्र बीडमध्ये एक अनोखा सत्कार सोहळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडला.
बीडमध्ये सर्रास खुल्या स्वरूपात सुरू असलेल्या गुटख्यावरून चक्क अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त इम्रान हाश्मी यांचा हार लावलेल्या टोपलीत गुटखा, सिगारेट, तंबाखू यासह विविध प्रकारचा गुटखा देऊन अनोखा सत्कार केला आहे.
दरम्यान गडगंज पगार घेणारे या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नऊ महिन्यात केवळ एकच कारवाई केली आहे. तर दुसरीकडे बीड पोलीस हे आठवड्यातून दोन- तीन कारवाया गुटख्याच्या करतात. मग पोलिसांना दिसणारा गुटखा अन्न औषध प्रशासनाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना का दिसत नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्याच बरोबर गुटखा माफियांना याच अधिकाऱ्यांचं पाठबळ असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे
तर अन्न पुरवठा मंत्र्यांना घराबाहेर निघू देणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सचिव नीलकंठ वडमारे यांनी यावेळी सांगितले, की बीड शहरासह जिल्ह्यात टपरी, किराणा दुकान यासह विविध प्रकारच्या दुकानांमध्ये गुटख्याची सर्रास विक्री केली जाते. मात्र यावर कुठलीच ठोस कारवाई अन्न औषध प्रशासनाकडून केली जात नाही. केवळ खुर्चीला भार म्हणून हे अधिकारी जिल्ह्यात काम करतायेत. जर बीड जिल्ह्यातील गुटखा माफीयांना लगाम लावला नाही. त्यावर कठोर कारवाई केली नाही. तर अन्न पुरवठा मंत्री यांना घराबाहेर निघू देणार नाहीत; असा सज्जड दम वजा इशारा यावेळी नीलकंठ वडमारे यांनी दिला.
कर्मचारी कमी असल्याचे कारण
याविषयी अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त इमरान हाश्मी म्हणाले, की आमच्या कार्यालयात स्टाफ कमी आहे. केवळ 11 कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात आहेत. त्यामुळे कारवाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर्षी फक्त एकच कारवाई करता आली आहे. आता निवेदन मिळाले असून आता कारवाई करू. असं हाश्मी म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…