ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका स्वीकारली……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाराणसी :- ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवला होता.
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद संकुलात असलेल्या माँ शृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजेची मागणी करणारी हिंदू समाजाच्या बाजूने याचिका दाखल केली गेली होती, ती याचिका कायम ठेवण्या योग्य आहे की नाही त्यावरच वाराणसीचे जिल्हा न्यायालयाने आज सुनावणी केली आहे. मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळत हिंदू पक्षकारांची याचिका स्वीकारली आहे. दरम्यान, या वरचा निर्णय आता 22 सप्टेंबरपर्यंत देण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण ?
ज्ञानवापी मशिदी बाहेरील भिंतीवर असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पूजा करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी दिल्लीतील राखी सिंग आणि वाराणसीतील चार महिलांनी गेल्या वर्षी न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यानंतर मात्र दिवाणी न्यायाधीशांच्या आदेशानुसार मे महिन्यामध्ये ज्ञानवापी परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल गेल्या 19 मे रोजी जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला होते, त्यानंतर सर्वेक्षणादरम्यान, हिंदू बाजूने ज्ञानवापी मशिदीच्या वाजू खान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला होता, तर मुस्लिम बाजूने ते कारंजे असल्याचे सांगण्यात आले होते. या सर्व प्रकरणावर त्यावरच आता वाराणसी जिल्हा न्यायालयाने आजची सुनावणी करत याचिकाकर्त्यांना 15 सप्टेंबर ही तारीख सुनावणीसाठी दिली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…