“आपला समुद्रकिनारा आपली जबाबदारी” पार पाडण्यासाठी मनसैनिकांसह अमित ठाकरे पोहोचले दादर चौपाटीवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गणपती विसर्जनानंतर आज (शनिवारी) सकाळी मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सहभाग घेतला.
अनेक पर्यावरणप्रेमींसह अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला.
“आपला समुद्रकिनारा आपली जबाबदारी” असे म्हणत वर्सोवा विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली सात बंगला – वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मनसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवत मोठ्या प्रमाणात समुद्रात किनाऱ्यावर वाहून आलेले निर्माल्य आणि इतर कचरा गोळा केला. यावेळी सफाई मोहिमेत मनसैनिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला. या मोहिमेचे काही फोटो मनसेने ट्विट केले आहेत.

याप्रसंगी त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण-तरुणीसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
गणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष पुढे येताना दिसत आहेत. दिव्याज फाउंडेशनच्यावतीने गणेश विसर्जनानंतर जुहू बिच स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस , अभिनेते अनुपम खेर , अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यासह विविध भाजप नेत्यानी उपस्थिती दर्शवत जुहू बीच स्वच्छतेची मोहिम हाती घेतली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…