संजय राऊतांच्या जामिनाबाबत मोठी बातमी ; विशेष न्यायालयाचे ईडी ला काय दिले निर्देश….? पाहूया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता पण त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
एकीकडे त्यांच्यावर असलेल्या आरोपावरुन चौकशी सुरु असताना दुसरीकडे त्यांनी दाखल केलेल्या जामिन अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत (ED Office) ईडीने उत्तर द्यावे असे निर्देशच विशेष पीएमएलए न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली गेली असली तरी, 16 सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयाकडून काय उत्तर दिले जाते? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोठडीत वाढ नंतर अर्ज
दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर लागलीच राऊत यांनी जामिनीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. गुरुवारी त्यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी झाली असून या संदर्भात ईडी कार्यालयाने 16 सप्टेंबरपर्यंत आपले उत्तर द्यावे असे निर्देश देण्यात आले आहे. आता ईडी कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या उत्तरावरच राऊतांचा मुक्काम 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार का त्यापूर्वी काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.
राऊतांवर नेमका आरोप काय..?
पत्राचाळ हा म्हाडाचा भूखंड आहे. म्हाडा व भाडेकरुंची दिशाभूल करुन प्रवीण राऊत यांनी यामधील अनेक भाग हा खासगी कंत्राटदारांना देऊ केले व 25 टक्के शेअर्स हे एचडीआयएलला विकले. शिवाय या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यामध्ये जमा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…