अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 08 सप्टेंबर :- भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत येऊन गेले होते. पण, त्यांच्या या दौऱ्यामध्ये सुरक्षेत मोठी चुकू झाल्याचे समोर आले आहे.
शहा यांच्याजवळ एक व्यक्ती संशयितरित्या फिरत होता. पोलिसांनी (mumbi police) या व्यक्तीला अखेर ताब्यात घेतले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. एकदिवशी दौऱ्यामध्ये त्यांनी लालबागचा राजा आणि भाजप नेत्यांची बैठक घेतली होती.
पण, या दौऱ्यादरम्यान, एक व्यक्ती शहा यांच्या जवळपास पोहोचली होती. बऱ्याच वेळ ही व्यक्ती भटकत होती. हेमंत पवार असं या तरुणाचे नाव आहे. हा तरुण धुळ्यात राहणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेमंत पवार याने आधी आपण आंधप्रदेश सरकारमधील खासदाराचा सचिव असल्याचे सांगून अमित शहा यांच्याजवळपास फिरत होता. त्याच्या वागणुकीवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असता तो धुळ्याचे असल्याचे उघड झाले. हेमंत पवार हा कशासाठी तिथे आला होता, अमित शहा यांच्याजवळ जाण्याचे कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व नेत्यांना आदेश दिले असून 150 जागांचे टार्गेट दिले आहे. तसंच, ‘शिवसेनेनं (shivsena) आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’ असं म्हणत अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…