“उद्धव ठाकरे तुम्ही पोराची काळजी घ्या” ; डावा हातही तुरुंगात जाणार म्हणत किरीट सोमय्यांचा थेट इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यानंतर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही तुरुंगात जातील, असं सूचक विधान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही पोराची काळजी घ्या, असं विधान किरीट सोमय्यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले की, “गेल्यावेळी गणरायाचं दर्शन घेताना मी तुरुंगात जात होतो, आज संपूर्ण महाराष्ट्र तुरुंगातून बाहेर आला आहे, म्हणून गणपतीला धन्यवाद दिला. महाराष्ट्राला विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची शक्ती दे, अशी प्रार्थना केली.”
यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. टीका करताना सोमय्या म्हणाले की, “ज्यादिवशी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळलं, त्यादिवशी महाराष्ट्रावरील अमंगल संपलं. आता स्वयं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मंगलमय दिवस आणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या माफीया सरकारला महाराष्ट्रातील जनतेनं कायमचं रवाना केलं आहे.”
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे, तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही तुमच्या पोराची काळजी घ्या. आज दुपारी महापालिकेनं आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या मढ येथील १००० कोटींच्या स्टुडीओ घोटाळ्याची चौकशीची घोषणा केली आहे. त्यात पर्यावरण मंत्रालयाने बेकायदेशीरपणे १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे ठाकरेंनी स्वत: च्या मंगलाची काळजी करावी, असा थेट इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…