महागाव शहरातील कचरा बाजार समितीच्या यार्ड मध्ये ; एपिएमसी झाले डंपिंग ग्राऊंड ; घनकचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक बेजार ; प्रभागसेवकांची चुप्पी
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह :
महागाव :
महागावच्या पंचक्रोशित शहराचा कचरा टाकायला जागा मिळत नाही . त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने यावर सोपा उपाय शोधून काढला. शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्येच घनकचरा टाकण्याची अफलातून शक्कल लढविण्यात आली. याला बाजार समितीच्या एका अवक्कलशुन्य पदाधिकार्याचे समर्थन असल्याचे सुत्रांकडून कळते . परंतु या उकिरड्यामुळे आता आजूबाजूच्या रहिवाशांना आपल्या घरी राहणे मुश्किल झाले आहे.

बाजार समितीच्या यार्डमध्ये मोठी विहिर आहे. कधी काळी येथून २ प्रभागाची तहान भागायची. कालौघात विहिर कोरडी पडली त्याचा सदुपयोग ? नगर पंचायत घेत आहे. साऱ्या गावाचा कचरा येथे रिचवण्यात येत असून दुर्गंधीमुळे प्रभाग सहा आणि प्रभाग सतरा मधील नागरीक नाक आणि जीव मुठीत धरून कसेबसे दिवस काढत आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट घेणारे बेलगाम झाली असून त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण उरलेले नाही. दोन दिवसात हा कचरा बाजार समितीच्या विहिरीतून उपसून शहराबाहेर टाकला नाही तर स्वखर्चाने समितीच्या कार्यालयात हा कचरा नेऊन टाकण्यात येईल असा इशारा विरोधी पक्ष नेते शैलेश कोपरकर यांनी दिला आहे.
समितीमधील कचऱ्याला सत्ताधिशांची सम्मती ?
बाजार समितीचे सभापती दीपक आडे यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका आहेत, शिवाय बाजार समितीचे संचालक सुरेश नरवाडे हे नगरपंचायत चे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. बाजार समितीच्या यार्ड मध्ये घनकचरा साठविण्यात येत असून यावर प्रतिबंध घालण्यात येत नसल्यामुळे सत्ताधीशांची याला मुकसंमती आहे काय असा प्रश्न जनता विचारत आहे.
प्रभाग सेवकांची चुप्पी ? आंदोलनाच्या पवित्र्यात
देशी दारूचे दुकान नव्यानेच प्रभाग १७ मध्ये देशी दारूचे दुकान सुरू करण्यात आले.याच प्रभागात आता शहरातील गोळा केलेला कचरा बाजार समितीच्या यार्ड मध्ये टाकण्यात येत आहे.त्याचे परिणाम बाजूच्या प्रभाग १७ व ६ च्या नागरिकांना भोगावे लागत आहेत.या प्रभागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले .असे असताना मात्र नगरसेवकांनी मात्र यावर चुप्पी साधली आहे.त्यामुळे आता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्या शिवाय आता पर्याय नाही

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…