“टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजे, इतकी सदस्यसंखा वाढवा” उद्धव ठाकरेंचं आवाहन ; शिंदे गटालाही लगावला टोला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या वाहतूक सेनेकडून नवीन सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
आज काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे ११ हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रे जमा केली आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
नवीन सदस्यांचे सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजे, इतकी सदस्यसंखा वाढवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे. नवीन सदस्य नोंदणीसाठी काम करणाऱ्या वाहतूक सेनेचंही त्यांनी यावेळी आभार मानले आहेत.
पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजेत, एवढी आपली सदस्यसंख्या वाढत आहे. ही सगळी तुमची मेहनत आहे. आपल्याकडे आता कुणी भाडोत्री लोकं राहिली नाहीत. जे आहेत ते सर्वजण तन-मन-धन सर्वस्व भगव्यासाठी वाहून टाकणारी लोकं आहेत. बाकी जे काही बोलायचं आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. याबाबत काहीही वाद नाही.”
शिंदे गटातील नेत्यांना टोला लगावताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “लढण्याचा एक काळ असतो, वाहतूक सेना म्हटल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांची सवय असते. रस्त्यात खड्डे असतात तरीही आपल्याला तो रस्ता पार करायचा असतो. हे खड्डे तर आपण पार करूच, पण जे खड्डे पडलेत, त्याचं काय करायचं? हे आपण उद्या बघू.”

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…