टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधन ; उद्योग विश्वा ची मोठी हानी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पालघरच्या चारोटी येथे सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालंय पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान अहमदाबाद- मुंबई रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला.
या अपघातात इतर दोन लोक दगावल्याचे पोलिसांनी सांगितले तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिस्त्री यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे, तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. मिस्त्री हे वयाच्या 43 व्या टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते, त्यानंतर 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…