शिवसेना एकच , दुसरा गट गद्दरांचा ; बंडखोरींवर आदित्य ठाकरेंच्या घणाघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेत दोन गट नसून शिवसेना एकच आहे. शिवसेना आणि गद्दार अशी फाळणी सध्या झाली आहे. असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलाय.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय.
आदित्य ठाकरे यांनी देवापुढे काय मागितलं?
मी जेव्हा मंदिरात जातो किंवा देवासमोर उभा असतो तेव्हा काहीही मागत नाही. कारण मनातलं जे काही असते ते देवाला सगळं माहित असतं. फक्त हात जोडून आर्शिवाद घेतो. बाकी काहीच नाही.
दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया
आमच्या मनात कोणतीही शंका नाही. काळजी नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच आहे. कोणी आतापर्यंत इतकं गलिच्छ राजकारण केलेलं नाही. दसरा मेळाव्याने कुठल्याही पक्षाने सहकार्य केलेले आहे. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
शिंदे गटावर पुन्हा टीका
‘शिवसेनेत 2 गट नाही. एक शिवसेना आहे आणि दुसरे गद्दार आहेत. एक दुख नक्की होतं की, महाराष्ट्रात जी पंरपरा होती, जी संस्कृती होती. जे काही आमदार या गद्दारातून बोलत आहेत. हे संस्कृतीला धरुन नाही. हे सगळं घाणेरडं सुरु आहे. आमदारांना गमदाटी करताना, गुंडगिरी करताना, 50 खोके पाहिजे असं विचारताना आपल्या राज्यात किंवा इतर राज्यात असं कधी ऐकलेलं नाही. ही संस्कृती कुठून आली हे मला माहित नाही.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…