पालकमंत्री पदाचा टिढा सूटेना ; सर्वांनाच हवा स्वतःच्या जिल्हा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आता तीन आठवडे झाले तरी जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत. कोणत्या मंत्र्यांकडे कोणता जिल्हा सोपवायचा यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
बहुतांश मंत्री हे स्वतः च्या जिल्ह्याचे पालकत्व मिळावे म्हणून आग्रही आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडे कोणता जिल्हा सोपवितात याकडे मंत्र्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गणेशोत्सवानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगण्यात आले.
9 ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी 18 नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्री आणि जिल्ह्यांची संख्या पहाता सध्या एका मंत्र्यांना दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. असे असले तरी अनेक मंत्री हे स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे म्हणून आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे आणि अतुल सावे हे तीन मंत्री आहेत. हे तीनही मंत्री औरंगाबादचे पालकमंत्रिपद मिळावे म्हणून आग्रही आहेत. जळगावच्या पालकमंत्रिपदासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे दोघेही आग्रही असल्याचे समजते. मविआ सरकारमध्ये तत्कालीन कृषिमंत्री असलेले दादा भुसे हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांना आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हवे आहे. तर नाशिकसाठी गिरीश महाजन यांच्याच नावाची चर्चा आहे.
शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे उस्मानाबाद, उदय सामंत – रत्नागिरी, दीपक केसरकर – सिंधुदुर्ग, सुरेश खाडे – सांगली, शंभूराज देसाई – सातारा, रवींद्र चव्हाण – ठाणे, विजयकुमार गावित – नंदुरबार, राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई शहराचे पालकमंत्रिपद जाणार हे वळपास निश्चित झाले आहे.
चंद्रकांत पाटील पुणे की कोल्हापूर..?
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्याऐवजी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरसह महत्त्वाचा जिल्हा असलेल्या पुण्याचे पालकमंत्रिपद स्वतः कडे ठेवणार असल्याची चर्चा होती. मात्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…