“ईडीची भीती कोणाला दाखवता , हिम्मत असेल तर अटक करून दाखवा” ; अभिषेक बॅनर्जीचं शहांना थेट चॅलेंज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- ‘..तर माझी खुलेआम फासावर लटकण्याची तयारी आहे.’
गेल्या दोन-तीन वर्षांपासून भाजप ईडीची (ED) भीती दाखवून अनेक राजकीय नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असतानाच, आता आणखी एका नेत्यानं भाजपला (BJP) खुलं आव्हान दिलंय.
कोळसा तस्करी प्रकरणात ईडीनं शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची सुमारे सात तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
हिंमत असेल तर मला अटक करून दाखवाच, असं खुलं आव्हान त्यांनी अमित शहांना दिलंय. ईडीनं बजावलेल्या समन्सनुसार, अभिषेक बॅनर्जी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोलकाता येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले. या चौकशीनंतर त्यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तोफ डागलीय.
कोळसा तस्करी आणि प्राण्यांची तस्करी हे सर्व गृह मंत्रालयाच्या अंतर्गत घडलेय. त्यामुळं याला गृहमंत्री घोटाळाच म्हणायला हवं. गृहमंत्री शहा हे सर्वात मोठे पप्पू आहेत. त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. सर्वात आधी त्यांनी आपल्या मुलाला देशभक्तीचा धडा शिकवावा. प्राण्यांच्या तस्करीचा सगळा पैसा त्यांच्या मुलाकडंच गेला आहे. सीमेवर बीएसएफ तैनात आहे. बीएसएफ कोणाच्या अखत्यारित येतं? प्राण्यांची तस्करी होत असताना बीएसएफ काय करत होती? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केलाय. कोळसा तस्करीतून मी पाच पैसेही घेतल्याचं सिद्ध झालं तर माझी खुलेआम फासावर लटकण्याची तयारी आहे. सध्या केंद्रीय गृह मंत्रालय आम्हाला ईडी आणि सीबीआयचा वापर करून घाबरवण्याचं काम करतेय. पण आम्ही घाबरणार नाही, असंही अभिषेक बॅनर्जींनी मोदी सरकारला ठणकावून सांगितलं.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…