निवडणुकीच्या तोंडावर मनसे भाजपा मध्ये खलबतं..? ; शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आशिष शेलार यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले असल्याची माहिती दिली आहे.
ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

याआधी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज ठाकरे यांच्यात वाढत असलेल्या भेटीगाठी मुळे आगामी महानगरपालिका निवडणुकेच्या तोंडावर दोन्ही पक्षाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दोन दिवसात राज ठाकरे यांना भेटणारे ते तिसरे भाजप नेते आहेत. राज ठाकरेंच्या भेटीला अनेक भाजप नेते येऊन गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चाना उधाण आलं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…