“भाजप-मनसे एकत्र आले तर” ; जयंत पाटलांची मोठी भविष्यवाणी..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.
दोन्ही नेत्यांमधील ही बैठक सुमारे तासभर चालली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजप-मनसेमध्ये युती होईल अशी चर्चा रंगलेली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत भविष्यवाणी केली आहे. जयंत पाटील म्हणाले कि, भाजप मनसे युतीची चर्चा रंगली आहे. शिवाय त्या दृष्टीकोनातून हालचालीही सुरु आहेत. मात्र, हे दोन पक्ष एकत्र आले तर हिंदी भाषिकांच्या मतांचा प्रश्न उपस्थित होईल अशी एक भीती भाजपामध्ये आहे. तर दुसरीकडे मराठी मतदार हे उद्धव ठाकरेंबरोबर असल्याने त्यांचा वेगळा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मनसे आणि भाजपा ही युती होण्यापूर्वी अनेक बाबींवर अभ्यास केला जाईल. पण हे एकत्र येतील की नाही याबाबतही अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या निर्णयाबाबत आपण बोलणे उचित नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी शिवसेना आणि भाजपात हिंदूत्ववादी मतांची दुफळी निर्माण होते म्हणूनच भाजपाने हा डाव साधला आहे. त्यामुळे त्यांना हिंदूत्वाशी घेणे-देणे नाहीतर मतांच्या गोळाबेरजेसाठी केलेला कयास असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. शिवाय भाजपाचे हिंदूत्व हे बेगडी आहे. एक दिवस ते सर्वांसमोर येईलच असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…