भाजपा आणि शिवसेना यापुढे एकत्र निवडणूक लढवणार का..? ; दीपक केसकर म्हणतात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सिंधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त झाला आहे. त्यामुळे नकारात्मकता सोडून राजकीय मतभेद विसरून “सकारात्मक’ विचारांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करू. जिल्ह्याचा न झालेला विकास हाच आमचा शत्रू आहे, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.
तसेच यापुढे भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यापुढे सगळ्या निवडणूका लढवणार का याबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, असे वक्तव्यही केसकरांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
सिंधुदुर्गात सीसीटिव्ही कॅमेरा लावणार
आगामी निवडणुका ह्या शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच लढवण्यात येतील. त्याचा “फॉर्मुला ” वरिष्ठ स्तरावर ठरेल, त्याप्रमाणे पुढील भूमिका घेऊ असेही केसरकर म्हणाले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. जेणेकरून चोऱ्यांचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य होईल.
जिल्ह्याचा न झालेला विकास हाच माझा शत्रू
तर सिधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त झाला आहे. त्यामुळे जुने विरोध पुन्हा-पुन्हा न काढता पुढील राजकारण विकासाच्या दृष्टीने केले जाईल. जिल्ह्याचा न झालेला विकास हाच माझा आता शत्रू आहे, असेही मत केसकरींनी व्यक्त केले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…