भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माजी.आ. नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट ; विविध विषयांवर चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी ( ता.२९) उमरखेड विधानसभा मतदार संघाचे भाजपा माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत माजी मंत्री आ. अशोक उईके , माजी पालकमंत्री तथा आमदार मदन येरावार, आ. बोदकुलवार यांचा जंगी सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष यांच्या सदिच्छा भेटीमुळे विधानसभा मतदार संघातील राजकीय फेरबदल होण्याची संकेत राजकीय गोटातून मिळू लागले आहे.
प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले होते.उमरखेड येथे कार्यक्रमानिमित्त जात असताना उमरखेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली.
विधानसभा निवडणूकीत पक्षाने उमेदवारी टाळली.परंतु आपण एकनिष्ठ राहिले. संयम बाळगला. हे कौतुकास्पद आहे.आपला विचार केला जाईल. मतदार संघातील पक्षबांधणी वाढवावी.माझे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
नक्कीच आगामी निवडणूकीत विचार केला जाईल.असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांना कानमंत्र दिले.

उपस्थित कार्यकर्ते यांच्याशी प्रदेशाध्यक्ष यांनी संवाद साधला.तसेच विधानसभा मतदार संघातील उपस्थित कार्यकर्ते यांच्याकडून आढावा घेतला. माजी आमदार राजेंद्र यांनी शेतकऱ्यांवर कोसळलेल्या आस्मानी संकट आणि त्यातून झालेले शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या व्यथा त्यांनी मांडल्या. ग्रामीण रुग्णालयाची भव्य अशी कोरी इमारत उभी असताना रिक्त पदा अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.क्रीडा संकुल काम पूर्णत्वास नेण्यात यावे. नगरपंचायत क्षेत्रासाठी २० कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून द्यावा , व तालुक्यातील ग्रामपंचायत यांच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी माजी.आ. राजेंद्र नजरधने यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे केली आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि माजी आमदार नजरधने यांच्यात राजकीय चर्चा रंगली :
बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या सोबत झालेल्या पहिल्या भेटीमध्ये विधानसभेतील मतदार संघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.त्यामुळे आगामी
निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. तर जाता जाता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांना विधानसभा मतदार संघात संक्रिय राहण्याच्या सूचना केल्याने त्यांना पुढील राजकीय भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या असल्याने कार्यकर्ते यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…