महात्मा गांधीजी नंतर नरेंद्र मोदीचं भारतीयांना समजून घेतात :- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- महात्मा गांधींनंतर भारतीय जनतेचे मन समजून घेणारे कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
“मोदीजींनीच भाजपला सर्व पंथीयांनी जात आणि समुदायाच्या सीमा तोडून स्वीकारायला लावले. त्यांनी एक असे मॉडेल तयार केले आहे ज्याला कोणही तोडू शकत नाही. स्वतंत्र भारतात तुमच्याकडे असा दुसरा नेता नाही ज्याने त्यांना दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या असतील. भाजपने २०१४ नंतर जे काही वैभव प्राप्त केले आहे, त्यात शंका नाही. हे मोदीजींमुळेच झाले आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले.
राष्ट्रपतींचे प्रेस सचिव अजय सिंग यांच्या ‘द आर्किटेक्ट ऑफ द न्यू बीजेपी: हाऊ नरेंद्र मोदी ट्रान्सफॉर्म्ड द पार्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन काल झाले. या प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते, यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
राजनाथ सिंह म्हणाले, “महात्मा गांधींनंतर भारतातील लोकांची मने समजून घेणारा एखादा नेता असेल तर ते मोदीजी आहेत. त्यांना लोकांच्या भावना आणि त्यांच्या समस्या समजतात. या कार्यक्रमात उपस्थित असलेले राज्यसभेचे उपसभापती हरिवंशही उपस्थित होते. यावेळी बोलताना हरिवंश म्हणाले, ‘मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…