भाजपकडून हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ ; चार नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी…..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाले. पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे. यात भाजपकडून ८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होऊ शकतो, यात १२ ते १५ मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. हा शपथविधी साध्या पद्धतीने राजभवनवर होणार आहे, असं बोलले जात आहे.
भाजपकडून (BJP) आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा हे आमदार शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.
या मंत्रिमंडळात भाजप आमदार नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा या चार नव्या आमदारांना मंत्रिपदावर संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप गृहखात्यासह महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.
मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना प्राधान्य
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. मंत्रिपद मिळेल अशी अनेकांना आशा आहे. पण मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी मिळणार आहे, असे कळते. त्याबाबत काही नावांवर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे, असेही सांगण्यात येत आहे.