लवकरच , लवकरच , लवकरच…; मंत्री मंडल विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन बराच काळ लोटला आहे. मात्र अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही त्यामुळे विरोधकांडून एकनाथ शिंदे गट आणि सरकारवर टीका होत आहे.
दरम्यान, आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीतील सिग्नलशिवाय होईना झालाय असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार म्हणाले, यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून लवकरच, लवकरच, लवकरच इतकेच शब्द येत आहेत. होईल, होईल.. पण कधी होईल याचे उत्तर यांच्याकडे नाही. महाराष्ट्रात चांद्यापासून ते बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. अतिवृष्टी, पाऊस, शिक्षणाशी संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांसमोरील अडचणी आहेत याची जबाबादारी कोण घेणार ? असा सवाल पवारांनी केला आहे.
या सगळ्यावर आम्ही दोघे आहोत असे उत्तर दिले जाते. पण ही कामे फक्त दोघांनी करण्यासारखी आहेत का याचा विचार होण्याची आवश्यकता आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…