राज्यातील सगळे काम सोडून फडणवीस पुन्हा हा दिल्लीला ; मुख्यमंत्री आजारी ; मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात सध्या दोघांचेच सरकार चालले असतानाही आणि राज्यात अतिवृष्टीचे (Heavy Rain ) संकट ओढावले आहे. त्या परिस्थितीतही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात कमी आणि दिल्ली दौऱ्यावरच जास्त आहेत.
त्यामुळे आता त्यांच्यावर टीका होत असतानाच राज्यातील सरकारच्या गाडीचे पहिले चाक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बेतीचे कारण देत त्यांनी गुरुवारचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. तर त्याच गाडीचे दुसरे चाक म्हणजे देवेंद्र फडणवीसही आता आपली कामं सोडून तेही आता दिल्लीला रवाना झाले आहेत.
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार बनून महिन्यापेक्षाही जास्त काळ उलटून गेला आहे, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही.
जुनेच सरकार नव्याने स्थापन होणार
माध्यमांच्या अहवालानुसार असा दावा करण्यात आला आहे की आता शुक्रवारी महाराष्ट्रातील महिनाभरापूर्वीचेच जुने सरकार नवे मंत्रिमंडळ स्थापन करणार आहे. मात्र, त्याच्या एक दिवस आधीच महाराष्ट्र सरकारमधले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन गुरुवारी सर्व सभेंचे कार्यक्रम रद्द केले आहेत. तर दुसरीकडे, दुसरे चाक म्हणजेच देवेंद्र फडणवीसानीही आपली सर्व कामं सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब होणार
राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी मंत्रीमंडळाच्या यादीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब करण्यासाठी फडणवीस दिल्लीत आले आहेत. असं असलं तरी पहिल्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि कोणा कोणाला मंत्री बनवायचं याबाबत राज्यातील भाजप नेते द्विधा मनस्थितीत आहेत. त्याचबरोबर शिंदे गटातील कोण मंत्री होणार आणि कोणाला किती सत्तेत वाटा मिळणार, ही चिंताही शिंदे गटातील नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार 5 ऑगस्टला होणार?
आता शिंदे सरकारवर दबाव वाढत आहे, कारण 1 महिन्याहून अधिक काळ लोटला असून मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. 30 जून रोजी शिंदे आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून आजपर्यंत हे दोनच मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन निर्णय घेत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने आणि त्यामुळेच मंत्र्यांची निवड न झाल्याने हे दोन्ही मंत्री जुलै महिन्यात राज्यात आलेल्या पुराचे नियोजन आणि मदतीसाठी हे दोघे मंत्री करत होते.
5 ऑगस्टला दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ
आज म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही आपण ठरवलेले सर्व कार्यक्रम रद्द केले. मुख्यमंत्र्यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण दिले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची गोष्ट समोर आली आहे. आज जर दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडने त्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील दिला तर उद्या म्हणजे 5 ऑगस्टला दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…