शेतकऱ्यांनी दुकानांचा लाभ घ्यावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 2 ऑगस्ट :- जिल्हा नियोजन निधी नावीन्यपुर्ण योजनेअंतर्गत कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे शेतातील माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविणेकरीता हक्काची जागा/बाजरपेठ दुकानगाळे उपलब्ध करून देण्यासाठी कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र मधिल 4 दुकानगाळे व्यवस्थापन समिती मार्फत उपलब्ध करण्यात येत आहे.
सदर दुकानगाळे आत्मा अंतर्गत नोंदणी असलेले शेतकरी गट,फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना प्रायोगिक तत्वावर 5 महीन्याकरीता भाड्याने देण्याचे नियोजन आहे. ईच्छुक शेतकरी गट,महिला बचत गट,फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळता अर्ज सादर करावेत. सदर अर्ज कृषी विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ येथे सादर करावेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी गट, महीला बचत गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…