शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का ; माजी मंत्री सुरेश नवले यांचा शिंदे गटात प्रवेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- औरंगाबाद येथील सिल्लोडच्या कार्यक्रमात आज माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून बीडमधून नवले समर्थक कार्यक्रमाकडे रवाना होत आहेत.
शिवसेनेत असताना त्यांनी मंत्रीपद भूषवले होते. तर एकेकाळी ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले सुरेश नवले आज मात्र शिंदे गटात प्रवेश होणार आहेत. हा शिवसेनेसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.
राजकारणात बरेच वर्ष अलिप्त राहून त्यांनी नवले मित्र स्थापन केलं. त्या माध्यमातून काम आज मात्र ते प्रवेश करत आहे. सिल्लोड नगर परिषदेस भरीव निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन अब्दुल सत्तार यांनी केले. याच कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांच्यासह सुरेश नवले यांचा देखील प्रवेश शिंदे गटात होणार आहे.
शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेत प्रवेश करतो आहे. हा गट नाही. हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे मी आणि माझे मित्र आज आम्ही प्रवेश करतो आहे. उद्धव ठाकरे हे गेली अडीच वर्ष आमदार खासदारांपासून हजारो कोस दुर होते. आमदारांना भेटणं त्यांना शक्य नव्हतं. अत्यंत अपमानास्पद वागणूक आमदार आणि खासदारांना मिळाली आहे. त्यातून हा उठाव घडला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला तसा अर्थ राहत नाही, अशी प्रतिक्रिय सुरेश नवले यांनी माध्यामांशी बोलताना दिली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…