धनुष्यबाण कोणाचं…? ; यावर फडणवीसांचं मोठं विधान , म्हणाले , आम्हाला…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र त्यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं.
त्यातच आता शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह नेमक कोणाचं असा पेच निर्माण झाला असून हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनुष्यबाण नेमका कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोग करेल. दोन्हीकडचे दावे निवडणुक आयोगाकडे पोहोचले आहेत. मात्र आमचा पाठिंबा धनुष्यबाणासाहित शिंदे साहेबांना आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्यकडेच येईल, असंही फडणवीसांनी नमूद केलं.
शिवसेना कोणाची याचे पुरावे 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यानुसार दोन्ही बाजुने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की, निवडणूक आयोगाने आम्हाला पुरावे सादर करण्याचे पत्र दिले आहे. आम्ही निवडणूक आयोगासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. आम्ही शिवसेना आहोत. आमचे 50 आमदार आणि लोकसभेत 2/3 सदस्य आमच्यासोबत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं की, शिवसेना कोणाची आहे, यासंदर्भातील पुरावे आमच्याकडे आहे. त्यामुळे ”दुध का दुध पाणी का पाणी”, होईल असंही सावंत यांनी म्हटलं.