मंत्रिमंडळ विस्तारचा सस्पेन्स अजूनही कायम ; इच्छुकांची धाकधूक वाढली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातला मंत्रिमंडळ विस्ताराचीच सर्वत्र चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हाच सवाल आता सगळीकडे चर्चेत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय.
अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात याबाबत अजूनही चर्चा झाली नसल्यानं विस्तार रखडल्याची माहिती मिळाली आहे. विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्यानं त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त ठरणार आहे.
राज्यात सत्तांतरानंतर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक आणखी वाढली आहे.. त्यात शिंदे गट आणि भाजपच्या काही आमदारांनी दिल्ली गाठली आहे. अमित शाह यांच्याशी अद्याप चर्चा बाकी असल्यानं विस्तार रखडला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व बंड करून हादरा देणाऱ्या शिंदे यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. बंडानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिकपासून औरंगाबादपर्यंत बंडखोरांच्या मतदारसंघात दौरा केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हेदेखिल नाशिकपासून औरंगाबादपर्यंत दौऱ्यावर निघत आहेत. या दौऱ्यात शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिंदे उत्तर देणार का याचीही उत्सुकता आहे.
मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार?
मंत्रीमंडळाचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार आहेत, परंतु अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची चर्चाच झालेली नाही. भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदेंसोबत आलेल्या मोठ्या नेत्यांना मंत्री करावेच लागेल. त्याच प्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदेंना प्रादेशिक समतोल बघावा लागेल, असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदे सोबत जे मोठे नेते आलेले आहेत त्यांना मंत्री करावेच लागणार आहे. तसेच शिंदे यांना प्रादेशिक समतोल बघावा लागणार आहे. आलेले लोक शिवसेनेत डावलले जाते म्हणून आलेत, त्यामुळे सर्वांची अपेक्षा मोठी आहे. एकूण 42 मंत्री असावे लागतात त्यापैकी 2 म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले आहेत, आता राहिले 40. आता या 40 मध्ये 50 लोकांचे पारडे जड की 115 चे ही कसरत आहे. यांचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्याचं कळतंय. पण अजून अमित शाह यांच्यासोबत चर्चा अजूनही झालेली नाही, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचं बोललं जात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…