राज्यातील 10 राजकीय पक्षांची मान्यता रद्द ; केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पक्ष आणि निवडणूक चिन्ह कुणाचे यावरून रस्सीखेच सुरु असतानाच निवडणूक आयोगाने देशातील एकूण १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे.
यात महाराष्ट्रातील १० पक्षांचा समावेश आहे.
राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटामध्ये पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण (Bow-Arrow) आपल्याकडेच रहावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालय असतानाचा केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. तसेच, त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्हही गोठवले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने धनुष्यबाण हे चिन्ह आपल्या गटाला द्यावे अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर, शिवसेनेने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबतचा निर्णय निवडणूक अयोग्य घेऊ शकत नाही अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पक्ष आणि निवडणूक चिन्ह कुणाचे यावरून रस्सीखेच सुरु असतानाच निवडणूक आयोगाने देशातील एकूण १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील १० पक्षांचा समावेश आहे.
राज्यातील पक्षांवर झालेली कारवाई
दिल्ली ३३, उत्तर प्रदेश १०, आसाम ९, जम्मू काश्मीर ८, बिहार ६, आंध्र प्रदेश ५, ओरिसा ३, गुजरात ३, केरळ ३, तामिळनाडू ३, मध्य प्रदेश ३, पश्चिम बंगाल २, मिझोराम २, कर्नाटक २, हरयाणा २, पंजाब १, हिमाचल प्रदेश १, राजस्थान १, झारखंड १, मेघालय १, उतराखंड १
हे आहेत महाराष्ट्रातील १० पक्ष
भारतीय आवाज पार्टी – मुंबई
वॉर वेतरणा पार्टी – मुंबई
जनादेश पक्ष – मुंबई
न्युज काँग्रेस – मुंबई
पीपल्स पॉवर पार्टी – मुंबई
राष्ट्रीय लोक जागृती पार्टी – ठाणे
शेतकरी विचार दल – अहमदनगर
भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष – पुणे
विदर्भ विकास पार्टी – नागपूर
विदर्भ राज्य पार्टी – नागपूर

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…