महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोण…? ; दिल्लीत मुख्यमंत्री परिषदेला शिंदेंच्या जागी फडणवीस उपस्थित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसाठी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्री परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते.
दरम्यान या परिषदेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे उपस्थित होते तर या परिषदेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित हेते. मुख्यमंत्री परिषदेला उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नक्की कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावरून शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी ट्विट करत भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री परिषदेचे आयोजन केले होते. मात्र यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उपस्थिती लावली की काय म्हणजे एकनाथ शिंदे नावालाच मुख्यमंत्री आहे तर असं म्हणत टोमणा मारला आहे. त्यामुळे आता चर्चाना ऊत आला आहे.
मुख्यमंत्री परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे. पी. नड्डा यांनी उपस्थित राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केले. राज्यात राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांविषयी या परिषदेत अहवाल सादर करण्याच्या सुचना या परिषदेत देण्यात आल्या आहेत अशी माहिती मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याचसोबत विविध योजनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले.
यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजुन का झाला नाही? अशी विरोधी पक्षाकडून वारंवार सवाल केला जात आहे. हे सरकार घटनाबाह असल्याचेही विरोधकांकडून बोलले जात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…