द्रोपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 21 जुलै :- राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. कारण भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चोबाधणी केलेली होती. या निवडणुकीत 17 खासदारांनी आणि 100 पेक्षा जास्त आमदारांनी या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिल्या आदिवासी समाजाच्या महिला या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत.
विशेष म्हणजे देशासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की, द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत. द्रोपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 खासदारांची मतं मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मतं मिळाली. द्रोपदी यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या मतांचं मूल्य 3 लाख 78 हजार तर यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचं मूल्य 1 लाख 45 हजार इतकं होतं.
या दरम्यान पहिल्या फेरीत 15 मतं रद्द झाली. द्रौपदी मुर्मू यांना दुसऱ्या फेरीतील मतमोजणीतही घवघवीश मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या दहा राज्यांची मतमोजणी करण्यात आली. या फेरीत एकूण 1886 मतं वैद ठरली.
त्यापैकी द्रोपदी मुर्मू यांना 1349 मतदान झालं. त्या मताचं मूल्य 483299 इतकं आहे. तर यशवंत सिन्हा यांना मतांची मुल्य ही 179876 इतकं ठरलं. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान घेण्यात आलं होतं.
या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार असल्याचं आधीच स्पष्ट होतं. त्यानुसार आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजेच 24 जुलै सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…