घराचे वीज बिल आले 80 हजार ; संतापलेला तरुण चढला हायटेन्शन तारांवर , नंतर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सराय (उत्तर प्रदेश) :- उन्हाळ्यात विजेचा वापर अचानक वाढतो. विजेचा वापर वाढला की साहजिकच बिलही वाढेल. परंतु अनेक वेळा वीज बिल अवाक्याच्या बाहेर येते.
अनेकदा ग्राहक वाढीव वीज बिल कमी करण्यासाठी संबंधित विभागाच्या चकरा मारतात. पण, उत्तर प्रदेशातील एका तरुणाने बिल कमी करण्यासाठी एक जीवघेणा प्रकार केला.

हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील सराय अकील पोलीस स्टेशन परिसरातील नंदा गावातील आहे. वीज बिल जास्त आल्याने संतापलेला तरुण चक्क एका हाय टेंशन लाइनवर चढला. हाय टेंशन लाइनवर बसलेल्या व्यक्तीला पाहून ग्रामस्थ घाबरले. त्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि 5 तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याला खाली आणले.
तरुणाला आले 80 हजाराचे बील
अशोक निषाद असे या तरुणाचे नाव असून, वाढीव बिलामुळे तो खूप तणावाखाली आला होता. या घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि निषाद यांना त्यांच्या तक्रारीची दखल घेण्याचे आश्वासन दिले. निषादची पत्नी मोना देवी यांनी दावा केला आहे की, वाढत्या वीज बिलामुळे पती तणावाखाली होता. 80,700 रुपयांचे वीज बिल आल्यानंतर निषादने गेल्या दोन दिवसांपासून नीट जेवणही केले नव्हते. बिल न भरल्यामुळे घराचे वीज कनेक्शन तोडण्यात आले, त्यांची तक्रारही अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तरुण खाली आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…