संजय राऊतांची मागणी ईडीने फेटालळी ; “या” दिवशी हजर राहण्याचे निर्देश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले असून. त्यानुसार संजय राऊतांना 27 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वी राऊतांना 19 जुलैला ईडीने समन्स बजावत 20 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे संजय राऊत हे सध्या दिल्लीत आहेत. संजय राऊत यांनी ईडीकडे चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता 8 ऑगस्टपर्यंतची वेळ मागितली होती. यानंतर ईडीने त्यांना 27 जुलैपर्यंतची मुदती दिली आहे. याच प्रकरणात राऊतांची 1 जुलैला ईडीने जवळपास 10 तास कसून चौकशी केली होती.

यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे. यापूर्वी याच प्रकरणात प्रवीण राऊत यांची यापूर्वी ईडीसमोर चौकशी झाली आहे. प्रवीण राऊत हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.
याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…