विधान परिषदेच्या निवडणूक मध्ये काँग्रेसचे फुटलेले सात आमदारांवर कारवाई करा ; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेपाठोपाठ आता राज्यातल्या काँग्रेसमध्येही अंतर्गत विरोधी आवाज येत आहे. विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या सात आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराला, चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसची काही मतं फुटल्याचं स्पष्ट झालं होतं. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमधून चंद्रकांत हंडोरे हे पहिल्या पसंतीचे उमेदवार तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते. चंद्रकात हंडोरे यांना एक दलित चेहरा म्हणून काँग्रेसने पुढं आणलं होतं. पण त्यांना पहिल्या पसंतीची मतंही मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.
सुरुवातीला काँग्रेसची केवळ तीन मतं फुटली असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आता सात मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेसच्या सात आमदारांनी हंडोरे यांना मतदान केलं नसल्याचं समोर आलं. ही बाब पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. या आमदारांवर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
फुटलेले आमदार कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे, ही बाब गंभीर असून याची दखल घेतली पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे काही आमदार उशीरा आले, ही बाबही चांगली नसल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी हायकमांडला कळवलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत, त्यामुळे या प्रकरणावर त्यांनी आपलं मत तातडीने एच के पाटील यांना कळवलं आहे. एकीकडे शिवसेनेत उभी फुट पडली असताना दुसरीकडे आता काँग्रेसमध्येही याचे पडसाद पडत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेसमधले फुटलेले हे सात आमदार कोण आणि त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याची उत्सुकता आता लागली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…