पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देणाऱ्याला पोलिसांनी केलं अटक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- आता एक धक्कादायक बातमी पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्र वेगवान फिरवत धमकी देणाऱ्याला अटक केली आहे.
दरम्यान, धमकी देणारा हा प्रत्यक्षात निरक्षर आहे. त्याने गूगल व्हॉईस सर्चवरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधून त्यानंतर फोन करुन धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे.
प्रभू कृष्णा सूर्यवंशी (वय 22, मुळ हाडसनी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रभू सूर्यवंशी याने यापूर्वी अशाच प्रकारे वरिष्ठ आणि उच्च पदस्थ पदाधिकारी आणि राजकीय नेते, मोठे उदयोगपती यांना कॉल केले होते. त्याच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाणे आणि वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
धमकीचा कथितपणे कॉल केल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. कॉल आल्यानंतर बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच वेटिंग रुम, रेल्वे ट्रॅक आणि स्टेशनजवळील सर्व पार्किंग लॉट तपासले गेलेत.
पुणे रेल्वे स्थानकावर 13 मे रोजी स्फोटक सदृश्य वस्तू मिळून आल्याने पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना राबवित आहेत. त्यामध्ये 1 पोलीस निरीक्षक आणि 50 पोलीस अंमलदार हे दररोज बंदोबस्तासाठी स्थानकावर नेमले आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…