“शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट” ; एकनाथ शिंदे गटाचे नाव अखेर ठरलं…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक दिवशी नवीन पावलं उचलताना दिसत आहेत.
यातीलच एक मोठं पाऊल म्हणजे शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव ठरवलं आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असं या गटाचं नाव असेल अशी माहिती विविध प्रसारमाध्यमांतून दिली जात आहे. गुवाहाटीच्या बैठकीनंतर हे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.