उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात “मातोश्री” वर खलबतं ; बैठक दोन तासांनी संपली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील सुरू असलेल्या पेचप्रसंगावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेने आता रस्त्यावरची लढाई सुरू करावी यावर एकमत झाल्याचं समजतंय.
तसेच 16 आमदारांवर कारवाईची कारवाई सुरू करण्यात यावी असंही ठरल्याचं समोर येत आहे. या बैठकीमध्ये अजित पवार, जयंत पाटील, अनिल देसाई, संजय राऊत उपस्थित असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर आता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत.
एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी शिवसेनेने आता रस्त्यावर उतरावं, रस्त्यावरची लढाई सुरू करावी असं या बैठकीत ठरल्याचं समजतंय. तसेच यामध्ये जास्तीत जास्त वेळकाढूपणा करावा, जेणेकरून शिंदे गटातील आमदारांवर अतिरिक्त दबाव तयार होईल असंही ठरलं आहे.
शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांवर कारवाई करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कायद्याच्या बाजू तपासण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.
आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा
आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते, आणि आम्ही बडवे होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, या सर्वामागे भाजपचा हात आहे. आतापर्यंत जे लोक भाजपसोबत गेले, ते सर्वजण संपले आहेत. मातोश्रीवर घाणेरडे आरोप केल्यानंतर मी शांत बसणार नाही. आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा. कितीही आमदार घेऊन जा, शिवसेनेला काहीही होणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, काही आमदार म्हणाले होते की तिकीट कापलं तरी आम्ही शिवसेना सोडून जाणार नाही. बंड झाल्यानंतरही शिवसेना दोन वेळा सत्तेत आली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…