भाजपचं राज्यपालांना पत्र ; पत्राद्वारे भाजपने केली मोठी मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राज्यपालंना पत्र लिहिलंय. आताच्या राजकीय भूकंपातली ही सगळ्यात मोठी बातमी मानली जातेय.
राज्यातील घडामोडींवर भाष्य करणाऱ्या या पत्रातून मोठी मागणी राज्यपालांकडे भाजपने केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत गेले काही दिवस भाजप सावध पवित्रा घेताना दिसत होती. वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर आता राजकीय पावलं उचलायलाही सुरुवात केलीय. पहिल्यांदाच राजकीय भूकंपानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते असलेल्या प्रवीण दरेकरांनी राज्यपालांना महाविकास आघाडीच्या गेल्या 48 तासांच्या कामगिरीवरुन शंका उपस्थित केली आहे.
सध्याची राजकीय स्थिती पाहता राज्यपालाना हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपने पाठवलेल्या पत्रावर राज्यपाल नेमकी काय ाकरावई करतं, हे पाहणं महत्त्वाचंय.
राष्ट्रवादी, काँग्रेसमधून बाहेर पडण्याची बंडखोरांची मागणी…..
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी, बंडखोर शिवसेना आमदारांनी केली आहे. निधी न मिळणं, पक्षाच नुकसान होणं, घट पक्षांकडून खच्चीकरण केलं जाणं, असे आरोप बंडखोर शिवसेना आमदारांनी केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाचा विचारही पुढे घेऊन जाण्यासाठी अनैसर्गिक आघाडीचा त्याग करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांचाही पाठिंबा. 50 पेक्षा जास्त आमदार आपल्याकडे समर्थनात असल्याचा दावा खुद्द एकनाथ शिंदे यांनी केलाय. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी शिवसेनेला साथ देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलंय.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…