800 पदांची भरती जाहीर ; MPSC ची घोषणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
या परीक्षेमुळे विविध संवर्गातील 800 पदांवर भरती केली जाणार. सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या आधीही 26 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2021 सहायक कक्ष अधिकारी पदासाठीचा निकाल 1 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता.
MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत महत्वपूर्ण बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेत महत्वपूर्ण बदल केलाय. त्यानुसार आता सिसॅटचा पेपर हा आर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पेपरमध्ये ३३ टक्के गुण प्राप्त उमेदवारांचे पेपर क्रमांक एकमधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या निर्णयामुळे कला, वाणिज्य शाखेतील उमेदवारांचे मुख्य परीक्षा देण्याचे प्रमाण वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
असा असेल बदल..
आता राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन तपासल्यानंतर, ज्या उमेदवारांना किमान ३३ टक्के गुण अर्थात ६६ किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक एक तपासला जाईल. पेपर क्रमांक एकच्या गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
“सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्याने कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आत्तापर्यंत सिसॅटच्या गुणांमुळे विज्ञान शाखा, तंत्रशिक्षण असलेल्या उमेदवारांचे पारडे जड राहात होते. आता सर्वांना समान संधी उपलब्ध होऊ शकतील.”

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…