मला मंत्री नाही केलं तर चालेल पण , भाजप सोबत सत्ता स्थापन करा ; एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांना मांगनी……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यामध्ये शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहिती आहे.
मला मंत्रीपद नाही दिलं तरी चालेल पण भाजपसोबत युती करावी असं त्यांनी म्हटलं आहे.
यावर मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर चर्चा करू, तुम्ही पहिला मुंबईत या असा संदेश दिला असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पुन्हा एकदा शिवसेना आमदारांची आणि नेत्यांची बैठक घेणार आहेत.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
महाविकास आघाडीसोबत कोणताही ताळमेळ नाही, आमदार आणि मंत्र्यांचीही तीच भूमिका आहे. पक्षाची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, त्यामुळे भाजपसोबत युती करणं हिच काळाची गरज आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपण असं काय केलं की ठाण्यामध्ये आपल्या विरोधात नाराजी पसरवली जातेय असंही भावूक होऊन त्यांनी विचारलं असल्याची माहिती आहे. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईत या, चर्चा करु असा संदेश दिला आहे.
दरम्यान, आपण कोणत्याही पक्षासोबत चर्चा केली नाही, कोणत्याही कागदावर सह्या केल्या नाहीत असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचीही तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या धरतीवर शिवसेनेला काँग्रेसची सोबत परवडणार नसल्याचं अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ खडसे हे सुरतमध्ये असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याची माहिती आहे. त्यांनी शिवसेनेविरोधात उघड बंड पुकारलं असून त्यांची मनधरणी करायला शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र फाटक सुरतला गेले होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…