अप्पासाहेब देशमुख यांना ईडी कडून अटक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) साताऱ्यातील मायणी (ता माण) येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना शुक्रवारी (१७ जून) अटक केली आहे.
पीएमएलए न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत ईडीची कोठडी दिली आहे.यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मागील वर्षी याच मनी लाँडरिंगच्या प्रकरणात ईडीने मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने अप्पासाहेब देशमुख यांना अटक केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात दोन्ही सख्ख्या भावांना अटक केल्याने सातारा जिल्ह्यात विशेषतः माण – खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून प्रवेशसाठी पैसे गोळा केल्या प्रकरणात मनी लाँडरिंगचा आरोप त्यांच्यावर आहे.
मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीला २०१२-१३ आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याची परवानगी मिळाली होती. १०० जागांसाठी (८५ शासकीय कोटा आणि १५ मॅनेजमेंट कोटा) ही परवानगी मिळाली होती. त्यात अतिरिक्त विद्यार्थी घेऊन त्यांचे कडून ज्यादा पैसे उकळण्यात आलेचा आरोप देशमुख यांच्यावर आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…