केंद्रीय तपास यंत्रणांना शिवसेने कडून धमक्या :- किरीट सोमय्यांचा आरोप…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. शिवसेनेच्या यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर खात्याने कारवाई सुरु केली आहे.
यावरुन आता भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर केला आहे.
‘मी यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या प्रकरणचा पाठपुरावा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या जात असल्याची माहिती दिली. तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकतात अशी धमकी शिवसेनेकडून केंद्रीय यंत्रणांच्या तपास अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. तसेच या संबंधी माझ्याकडे पुरावे असल्याचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या माझगाव मधील घरी ही कारवाई झाली होती. याशिवाय त्यांच्या निकटवर्तीयाच्या घरी देखील आयकर विभागाने छापा टाकला होता. मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापा टाकून कारवाई केली आहे. जानेवारी महिन्यामध्ये भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
दोन वर्षात यशवंत जाधव यांच्याकडून ३६ मालमत्ता खरेदी – किरीट सोमय्या
ट्विट करत किरीट सोमय्य यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केले होते. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी २४ महिन्यात मुंबईत १००० घर/दुकान/गाळे असलेल्या ३६ बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या. १००० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. ED, कंपनी मंत्रालय, आयकर विभागद्वारा तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा असं ट्वीट सोमय्यांनी केलं होतं.
कोणत्या वर्षात किती मालमत्ता खरेदी ?
2020 – 07
2021 – 24
मार्च 2020 – 1
डिसेंबर 2020 – 2
जानेवारी 2021 – 3
फेब्रुवारी 2021 – 2
मार्च 2021 – 5
मे 2021 – 1
जून 2021 – 2
जुलै 2021 – 6
ऑगस्ट 2021 – 2
डिसेंबर 2021 – 3