उत्तर भारतीयांची माफी मागा ; अन्यथा राज ठाकरेंना आयोध्या घुसू देणार नाही……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्यात घुसू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
ते म्हणाले, अयोध्यात येण्यापूर्वी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना हात जोडून माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय त्यांना भेटू नये असा सल्ला ब्रिजभूषण यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. खासदार म्हणाले, की राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काही संबंध नाही. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्यात रामललाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत.
कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी गुरुवारी एका पाठोपाठ ट्विट करुन राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे ( Raj Thackeray) यांना अयोध्याच्या सीमेत घुसू देणार नाही. अयोध्यात येण्यापूर्वी सर्व उत्तर भारतीयांची हात जोडून माफी राज ठाकरे यांनी मागावी, असे ते ट्विटमध्ये म्हणाले.
ब्रिजभूषण शरणसिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनाही ठाकरेंना न भेटण्याचा सल्ला देत ते म्हणाले, जोपर्यंत राज ठाकरे सार्वजनिकरित्या उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंना भेटू नये. राम मंदिर आंदोलनात ठाकरे कुटुंबाचा सहभाग नाकारत ते म्हणाले, राम मंदिर आंदोलनापासून ते मंदिर बांधकामापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांनी सहभाग घेतलेला आहे. ठाकरे कुटुंबाचा त्याच्याशी काही देणे-घेणे नाही.