यवतमाळ जिल्ह्यात भोंगा आंदोलन पोलिसांनी केले शांत ; जिल्ह्यातून अनेक कार्यकर्त्यांना बजावली नोटीस…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे काढण्यासंदर्भात दिलेला ‘अल्टीमेटम’ पूर्ण झाला.
त्यामुळे संपूर्ण राज्यात मनसे पदाधिकार्यांकडून मशीदांसमोर भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार होते. मात्र, यापूर्वीच पोलिसांनी संपूर्ण राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील मनसे पदाधिकार्यांवर करडी नजर ठेवत त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन दडपून टाकले.
यवतमाळ येथे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, अमित बगमारे या तीन पदाधिकार्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना काही वेळ स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सूचना देऊन सोडण्यात आले. विदर्भातील मनसेचा गड असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यात मनसैनिक सदैव आक’मक असतात.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह सात पदाधिकार्यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून उंबरकरांच्या वणी येथील घरासमोर कडेकोट बंदोबस्त लावून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर महागाव येथे 4 मनसे पदाधिकार्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली. यात तालुक्यातील मनसेच्या मु’य 4 पदाधिकार्यांना पोलिसांनी भांदवी कलम 149 ब अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहे.
भोंग्याच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापल्याने, या मुद्याला वाचा फोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना हनुमान चालीसा पठणाचा आदेश दिल्यानंतर ठिकठिकाणी मनसेकडून हे आंदोलन चालविण्यात आले. यामुळे सामाजिक तेढ आणि अराजकता माजू नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून अनेक पदाधिकार्यांना अटक करण्यात आली. तर महागाव तालुक्यातील मनसे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, शहराध्यक्ष संतोष जाधव, मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, मनसे तालुका उपाध्यक्ष राहुल जयस्वाल या पदाधिकार्यांना महागाव ठाणेदार विलास चव्हाण यांच्या स्वाक्षरीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…