“महाराष्ट्रात कोणाचीही हुकुमशाही चालणार नाही” ; अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- रविवारी औरंगाबादमध्ये मनसे नेते राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारला पुन्हा एकदा मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आवाहन केले आहे. मुख्य म्हणजे, या सभेत राज ठाकरे यांनी अटी -शर्तींचे पालन केले गेले नसल्याचे नुकतेच नुकतेच समोर आले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेवर आपले मत मांडले आहे. त्यांनी राज ठाकरेंना इशारा देत म्हणले आहे की, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कुणाचीही हुकूमशाही याठिकाणी चालणार नाही. कायद्याच्या विरोधात कुणी काही करेल तर पोलीस कारवाई करणार.
तसेच राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेविषयी बोलताना, “राज ठाकरेंनी मागच्या सभेतील भाषणच रिपीट केलं. शरद पवारांनी कधीही जातीच राजकारण केलं नाही. कारण नसतांना शरद पवारांचं नाव घ्यायचं, त्यांचं नाव घेतलं म्हणजे प्रसिद्धी मिळते. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही.” असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
त्याचबरोबर, “घरात बसून यांना बोलायला काय जातं? केसेस कार्यकर्त्यांवर दाखल होतील. कायद्याच्या विरोधात कुणी काही करेल तर पोलीस कारवाई करणार. कुणाच्या भाषणातून जातीय द्वेष पसरवला जात असेल तर हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. कुणी अल्टिमेटम देत असेल आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल” असंही अजित पवार यांनी म्हणले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सभेवर राज्य सरकार लवकरच कारवाई करणारं आहे. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. सध्या राज ठाकरे यांच्या सभेची टेप औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. या टेपमध्ये जर राज ठाकरे यांचे काही चुकीचे वक्तव्य आढळून आले तर त्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…