तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे नाहीतर काय मिळणार घंटा :- अजित पवारांनी केलं तुफान फटकेबाजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती, 27 मार्च :- ‘बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहे, पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. तिजोरीच्या चाव्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. नाहीतर ते काय देणार घंटा’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी जोरदार फटकेबाजी केली. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वस्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पावर बोलत होते.
‘सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्ता मामा राज्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणला आहे. संजय जगताप आणि दत्ता मामांना सांगावे लागते. आमच्याही तालुक्यावर लक्ष ठेवा, फक्त तुम्ही राज्यमंत्री इंदापूरचे नाही. मलाच विनंती करावी लागते, मला तरी काही तरी द्या. बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहे, पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. तिजोरीच्या चाव्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील.
मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार घंटा…’ असं म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली. (Alert! एका चुकीने होईल बँक अकाउंट रिकामं, SBI ने Online Fraud बाबत केलं सावध) तसंच, ‘आपल्या विधानामुळे वाद होऊ शकतो हे लक्षात आल्यावर आता गाडी घसरायला लागली, आता थांबतो’ असं म्हणत अजितदादांनी भाषण आवरतं घेतलं. आमच्या दिलीपराव यांनी चांगले काम केले आहे.
इतरांनीही चांगले काम करावे. आपल्या परिसरात चांगले काम करून आर्थिक परिस्थितीत सुधारावी, इतरांची परिस्थितीही चांगली करावी. आपल्या काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे चांगले काम करावे, असं आवाहनही अजित पवारांनी केलं.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…