शरद पवारांच्या भेटी साठी 12 खासदारांचा बारामतीत “गुप्त दौरा”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती (पुणे) :- राजकीय पंढरी बारामतीत विविध पक्षांचे बारा खासदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी शनिवारी दाखल झाले आहेत.
खासदारांचा हा दौरा वैयक्तिक स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दौऱ्याच्या अनुषंगाने राजकीय चर्चेला सध्या ऊत आला आहे.
सर्व खासदारांचे सकाळी बारामती विमानतळावर आगमन झाले. एकूण १९ खास लोकांचा हा दौरा आहे. यात १२ खासदार आणि काही उद्योगपतींचाही समावेश आहे. हे सर्व खासदार बारामती व परिसरातील विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर पाहुण्यांनी प्रथम लक्झरी बसमधून फेरेरो या आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीला भेट दिली. नंतर त्यांनी बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्सटाइल पार्कला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. येथील शिक्षण संकुल विद्या प्रतिष्ठानलाही भेट दिली. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे माहिती देत होते.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…