ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका ; परमबीरसिंह यांच्यावरील गुह्याबाबत मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे (CBI) हस्तांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरूवारी महाराष्ट्र पोलिसांना दिला. त्यामुळे ठाकरे सरकारला (Thackeray Government) मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे.
परमबीरसिंह यांच्यावर खंडणीसह विविध प्रकरणांमध्ये पाच फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून केला जात आहे. हे गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी परमबीरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. राज्य सरकारकडून सूड भावनेने गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याची योग्य प्रकारे चौकशी होणार नाही, अशी बाजू परमबीरसिंह यांनी न्यायालयात मांडली होती.
सर्वोच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांची ही मागणी मान्य केली आहे. न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला याबाबतचे आदेश दिले आहेत. पुढील आठवडाभरात पोलिसांनी सीबीआयकडे हा तपास वर्ग करावा, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. तसेच यापुढे त्यांच्यावर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपासही सीबीआयकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच याबाबत सर्वप्रकारचे सहकार्य करावे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे परमबीरसिंह यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, परमबीरसिंग यांच्यावर दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) करीत आहे. सीआयडीच्या हाती या प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर होती. श्यामसुंदर अग्रवाल याने छोटा शकीलद्वारे धमकी दिल्याचा आरोप विकसक संजय पुनमिया याने केला होता. मात्र, तपासात हे कॉल श्यामसुंदला अडकवण्यासाठी पुनामियाने हॅकरच्या मदतीने स्वत:च्याच कार्यालयातूनच केल्याचे समोर आले आहे. हा सर्व कट परमबीरसिंह याच्या सांगण्यानुसारच रचला गेल्याचा खुलासाही हॅकरने चौकशीत केला आहे. विशेष म्हणजे, छोटा शकीलचा आवाज आणि फोनचे लोकेशन पाकिस्तानामधील कराची दाखवण्यासाठी पुनामियाने विशेष सॉफ्टवेअर आणि व्हीपीएनचा वापर केला होता. असं सीआयडीच्या तपासात समोर आलं होतं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी परमबीरसिंह यांनाही नुकतेच फैलावर घेतले होते. परमबीरसिंह यांच्या विरोधातील खंडणीचा गुन्हा रद्द करावा, या प्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. पोलीस दलाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीचा त्याच दलावर विश्वास नसेल, तर आम्ही काय म्हणायचे, असे न्यायालयाने म्हटवे होते. दरम्यान, देशमुखांवर आरोप केल्यानंतर परमबीरसिंह अनेक महिन्यांपासून गायब होते. हे 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती. नंतर दुसऱ्या दिवशी ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची गोरेगावमधील खंडणी प्रकरणात चौकशी करुन जबाब नोंदवला होता. याच प्रकरणात त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….