आता राज्यातील महिला पोलिसांना फक्त आठ तास ड्युटी करावी लागणार ; मोठा निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाच्या तासांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांसाठी कामाची वेळ 12 तासांवरून 8 तासांवर करण्यात आली आहे.
अनेक वर्षापासून महिला पोलिसांची कामाची वेळ कमी करण्याची मागणी होत होती.
परंतू आता त्यावर निर्णय झाला आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाची वेळ कमी करण्यात आली आहे.
यामुळे महिला पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कुटूंबाला अधिक वेळ देता येणार आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासांवरून 8 तासांची करण्यात आली आहे.
कामाच्या 8 तासांचा निर्णय प्रायोगिक तत्वावर असणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे.
राज्यात प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…