गेल्या 24 तासात तीन पॉझिटिव्ह….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 02 डिसेंबर :-
गेल्या 24 तासात जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या निरंक आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 14 तर बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 17 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 458 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 455 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले तीन रूग्ण यवतमाळ येथील असून त्यात एक महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72942 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71137 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 66 हजार 535 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 93 हजार 529 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.52 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.66 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
*जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1755 बेड उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 14 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1755 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 14 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 773 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….