महागाव जिनिंग निवडणुकीचा बिगुल वाजला ; 26 डिसेंबरला निवडणूक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :-
महागाव तालुका शेतकरी जिनिंग-प्रेसिंग सहकारी फॅक्टरी मर्यादित महागाव ही संस्था अवसायानात काढण्यात आली होती परंतु त्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही संस्था पुनर्जीवित करून त्यावर हंगामी संचालक मंडळ नेमले आहे. संस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक सुधारणा नियम 2017 चे नियम 75(2)नुसार संस्थेच्या व्यवस्थापक सदस्याची 2021 ते 2006या पंचवार्षिक कालावधी करता निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि घोषित केला आहे.
संस्थेत एकूण पंधरा प्रतिनिधी निवडून द्यायचे असून
● सर्वसाधारण प्रतिनिधी 10
●अनुसूचित जाती\जमाती1
● महिला सदस्य 2
●वि.जा.भ.जा.व विशेष मागास
प्रवर्ग 1
●इतर मागासवर्गीय 1
असा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम 24 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी द्वारा सहकार अधिकारी श्रेणी1 सहकारी संस्था महागाव यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येत आहे. दिनांक 24 ते 30 नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. त्यानुसार जसेजसे नामनिर्देशन पत्र प्राप्त होतील तसतशी यादी दररोज प्रसिद्ध करण्यात येईल.
नामनिर्देशन पत्रांची छाननी 1 डिसेंबरला होणार असून वैध नामनिर्देशन पत्राची यादी2 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 2 ते16 डिसेंबर हा कालावधी असून निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम यादी व निशाणी दिनांक 17 डिसेंबर ला देण्यात येईल. आवश्यक असल्यास 26 डिसेंबर रोजी मतदान आणि 27 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल.
महागाव तालुक्यातील सहकारी संस्था डबघाईस आल्या असून संस्था शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन पुन्हा पुनर्जीवित करण्यात आली आहे या महागाव जिनिंगच्या निवडणुकीत सर्वपक्षीय संचालक मंडळ तयार करून निवडणूक अविरोध होण्याची शक्यता आहे…